राजमाता जिजाऊ समाजसेवा रत्न पुरस्काराने "गौरविण्यात येणार आहे
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
मातृ तीर्थ सिंदखेडराजा येथे 12 जानेवारी रोजी मा.महेश भैया डोंगरे पाटील यांना " राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ समाजसेवा रत्न पुरस्काराने" मातृ तीर्थ मध्ये सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार" छावा संघटनेच्या "वतीने राजे लखोजीराव जाधव यांचे वंशज माननीय विजयसिंह राजे जाधव व छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मा. नानासाहेब जावळे पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून लाखो शिवभक्त व जिजाऊ भक्तांना मोफत चहा, नाश्ता, पाण्याची व्यवस्था करतात.
जिजाऊ ब्रिगेडच्या हजारो महिलांना जेवणाची व्यवस्था करतात .त्यांच्या या समाजकार्याची छावा संघटनेने दखल घेऊन त्यांना "राजमाता जिजाऊ समाजसेवा रत्न पुरस्काराने "गौरविण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी खासदार बुलढाणा प्रतापराव जाधव साहेब, माजी मंत्री तथा आमदार सिंदखेडराजा डॉ. राजेंद्रजी शिंगणे साहेब, बुलढाणा विधानसभा आमदार संजय भाऊ गायकवाड, चिखली आमदार श्वेता ताई महाले पाटील, मेहकर मतदार संघ आमदार संजयजी रायमुलकर, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर साहेब, डॉ. रामप्रसादजी शेळके, नारायण राजे जाधव पाटील,
संजय राजे जाधव पाटील,विष्णुभाऊ पाचफुले,नगराध्यक्ष सतीश भाऊ तायडे, छावा संघटनेचे विजय भैया घाटगे पाटील, पैलवान, भीमराव भाऊ मराठे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे, दैवकरन वाघ,ह्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आयोजक अशोक राजे जाधव पाटील अखिल भारतीय छावा संघटना बुलढाणा जिल्हा अध्यक्ष व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा