आगामी लोकसभा विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत चर्चा
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली प्रतिनिधी शासकीय रेस्ट हाऊस येथे पहार जनशक्ती यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्यमंत्री बच्चू कडू त्यांच्या आदेशाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, नगरपालिका महानगरपालिका, जिल्हा परिषद, निवडणुकां संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाली. हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, औंढा, वसमत, तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष निवडी झाल्या तर शहर व ग्रामीण भागात शाखा स्थापन करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष रॉबर्ट बांगर यांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यात पहार जनशक्ती पक्षाची ताकद वाढणार असल्याचे देखील पुढे बोलताना सांगितले.
या बैठकीमध्ये विलास आघाव, सागर घाटोळे, विष्णू जाधव, सचिन राठोड, वानरे आदी प्रहार जनशक्तीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा