हिंगोली जिल्हा निर्मितीमध्ये पत्रकारांचे महत्त्वपूर्ण योगदान
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा आज जन्मदिवस आहे, जांभेकर यांचा जन्मदिन राज्यभर दर्पण दीन म्हणून साजरा करण्यात येतो, आज दर्पण दिनाचे औचित्य साधून हिंगोली जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या संत भगवान बाबा प्रतिष्ठान कडून जिल्ह्यातील पत्रकार बांधवांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, संत भगवान बाबा प्रतिष्ठानच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात हिंगोली जिल्हा निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या पत्रकार बांधवांना लेखणी, डायरी देऊन सन्मानित करण्यात आले, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत भगवान बाबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मेजर पंढरीनाथ घुगे तर प्रमुख पाहुणे म्हणून वंजारी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ कुटे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमासाठी, ज्येष्ठ पत्रकार वसंत भट, मकरंद बांगर, बालाजी पाठक, गजानन लोंढे, प्रदुमन गिरीकर, शाम सोळंके, ज्ञानेश्वर लोंढे, सुधीर गोगटे, चंद्रकांत वैद्य, मनीष खरात, संतोष भिसे, गजानन पवार, शेख फारुख, संजय टाकळगव्हाणकर, यांच्यासह जिल्ह्यातील असंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठानचे राजकुमार मोरगे, डॉ. नागेश बांगर, संजय बांगर आदींनी परिश्रम घेतले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा