आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, योग या चिकित्सा पद्धतीने तपासणी
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात बुधवारी घेण्यात आलेल्या आयुष निदान व उपचार शिबिरात आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, योग या चिकित्सा पद्धती नुसार वेगवेगळ्या प्रकारे एकूण २६० रुग्णांची तपासणी करण्यात आली.
राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि आयुष कक्ष जिल्हा रुग्णालयाच्या पुढाकाराने दर वर्षी प्रमाणे यंदाही मोफत आयुष निदान व उपचार शिबिराचे आयोजन जिल्हा आयुष अधिकारी डॉ. विद्या पोले यांनी केले होते. या शिबिराचे उदघाटन जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, यांच्या हस्ते झाले.
यावेळी डॉ. मंगेश टेहरे, डॉ. दीपक मोरे, डॉ. बालाजी भाकरे, डॉ. नामदेव कोरडे, डॉ. किरण कुऱ्हाडे, शंकर तावडे, श्रीपाद गारुडी, अधिपरिचरिका आशा क्षीरसागर, परिचारिका राठोडे, आदींची उपस्थिती होती.
दरम्यान, आयुर्वेद चिकित्सा मध्ये डॉ. सोनी अग्रवाल, डॉ. दीपक मोरे, डॉ.संजय नळगिरे यांनी ९० मधुमेह स्थूल या रुग्णांची तपासणी करून औषधी उपचार केले. तर होमिओपॅथी चिकित्सा द्वारे श्वसन संस्था, विकार, मूत्रा शमरी या आजाराच्या ८० रुग्णावर डॉ. संजय देशमुख, राजू नरवाडे, डॉ. सोफिया खान यांनी उपचार केले. तसेच युनानी चिकित्सा द्वारे त्वचा विकाराच्या ६० रुग्णावर उपचार करण्यात आले.याशिवाय योग व निसर्गोपचार पद्धती मध्ये जवसळपास तीस रुग्णावर संतोष वानखेडे यांनी उपचार केले.
शिबिर यशस्वीतेसाठी प्रशांत गिरी, एन.आर. शेख, सुनील जाधव, रेखा टेकाळे, जिजाबाई गिरी, सोनी कुरील, भारत भूषण रणवीर, यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ. दीपक मोरे यांनी केले .
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा