माजी आमदार हिंगोली चे भाऊ पाटील ताकत वाढणार
शिवशाही वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी हिंगोली चंद्रकांत वैद्य
हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत आपला स्वतःचा संघटना काँग्रेसमध्ये विलीन करून प्रवेश घेतला.
शेख नईम शेख लाल यांनी यापूर्वी समाजवादी पक्षाची जिल्हाध्यक्ष पदाची धुरा यशस्वीपणे पार पाडून जिल्ह्यामध्ये संघटन वाढीसाठी महत्त्वाचे कार्य केले होते त्यानंतर विचारांच्या मतभेदामुळे त्यांनी स्वतःचा राष्ट्रीय लोक मंच हा संघटना स्थापन करून आपली वेगळी राजकीय ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला सुरुवातीपासूनच त्यांना सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे अनेक आंदोलनामध्ये सहक्रिय सहभाग घेऊन आंदोलनाच्या माध्यमातून शासनाशी भांडुन महत्त्वाच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधलेले आहे.
आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्यामुळे त्यांनी हिंगोली शहरासह हिंगोली जिल्ह्यांमध्ये आपले संघटन मजबूत केलेले दिसून येते आज त्यांनी हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला यावेळी आमदार अमरनाथ राजूरकर, डॉ अंकूशराव देवसरकर, दिलीपराव देसाई जिल्हा अध्यक्ष, भास्करराव बेंगाळ तालुकाध्यक्ष, बापूराव पाटील तालुका अध्यक्ष,पवन उपाध्ये शहर अध्यक्ष, दाजीबा पाटील, संतोष जगताप,शेख अनिस शेख लाल ,शेख नईम शेख लाल , रवी जैस्वाल , शेख बसीत , शेख नउमन नईम
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा