maharashtra day, workers day, shivshahi news,

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील कन्येच्या हस्ते होणार जिजाऊ जन्मोस्थळावर हेलिकॉप्टरने होणार पुष्पवृष्टी

राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंना अनोखी मानवंदना
Flower shower by helicopter at Jijau birth place, sindkhedraja, buldhana, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त १२ जानेवारी रोजी 11 वाजता जिजाऊ जन्मोस्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील पांगरखेड येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील कन्या प्रतिक्षा रामेश्वर जायभाये हिच्याहस्ते जिजाऊंना अनोखी मानवंदना देण्यात येणार आहे. अभिता कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांनी ही माहिती दिली.
देशाला दोन छत्रपती देणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ यांची १२ जानेवारी रोजी जयंती आहे. दरवर्षी जिजाऊ जन्मोत्सव राज्यभर धुमधडाक्यात साजरा केला जातो. जिजाऊंचे माहेर असलेल्या सिंदखेड राजा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त जिजाऊ राजवाडा उजळून निघतो. देशभरातून जिजाऊ भक्त अभिवादनासाठी मातृतीर्थावर येतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त अभिता कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांची कन्या अभिता हिच्या हस्ते जिजाऊ जन्मोस्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली होती. मात्र यावर्षी सिंदखेडराजा तालुक्यातील पांगरखेड येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील कन्या प्रतीक्षा रामेश्वर जायभाये हिच्या हस्ते जिजाऊ जन्मोस्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. 
या २० वर्षीय कन्येला हा मान सन्मान देण्यात आल्याच्या निर्णयामुळे अभिता कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे. शेतकऱ्याप्रती असलेली भावना त्यांनी निर्णयाद्वारे अधोरेखित केली आहे.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !