maharashtra day, workers day, shivshahi news,

मातृतीर्थ सिंदखेडराजा वासियांसाठी आनंदाची बातमी - ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय होणार आता १०० खाटांचे

आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नांना यश
MLA Dr.Rajendra Shingane's efforts are successful, 30-bed rural hospital will now have 100 beds, sindkhedraja, buldhana, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
मातृतीर्थ सिंदखेडराजा वासियांची आनंदाची बातमी आहे. सिंदखेडराजा नगरीचे ग्रामीण रुग्णालय आता १०० खाटांचे होणार आहे. विशेष बाब म्हणून शासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा उंचावला गेला आहे.
मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय १०० खाटांमध्ये केल्या जाईल. तसेच रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी व पदनिर्मितीसाठी स्वतंत्र कार्यवाही करण्यात येईल असे शासन निर्णयात म्हटले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून आ. डॉ.राजेंद्र शिंगणे यासाठी पाठपुरावा करत होते. या निर्णयाने त्यांच्या प्रयत्नाला फळ मिळाले आहे. तसेच संपूर्ण सिंदखेड राजा वासियांसाठी ही आनंदाची वार्ता आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी अधिक सुकर मार्ग झाला आहे.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !