सुमारे 900 जणांनी घेतला शिबिराचा लाभ
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली तालुक्यातील फाळेगाव येथे 30 डिसेंबर रोजी भारत संकल्प यात्रा निमित्त आयोजित कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आले असताना आयुष्यमान भारत कार्ड योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन केले. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत आयुष्यमान भारत कार्ड वाटप करण्यात आले.
याप्रसंगी आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी खुशाल सिंग परदेशी, जिल्हा परिषद मुख्याधिकारी संजय दैने, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, जिल्हा आरोग्य अधिकारी कैलास शेळके, तालुका आरोग्य अधिकारी नामदेव कोरडे, तहसीलदार नवनाथ गडवाल, डॉक्टर मनीष बगडिया, तसेच अधिकारी, कर्मचारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. शिबिरामध्ये सुमारे 900 जणांनी या शिबिराचा लाभ घेतला
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा