आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी दिलेनिवडीचे पत्र
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते निनाजी कांडेलकर यांची शासकीय रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली आहे. हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे व हिंगोली लोकसभा प्रभारी रामदासजी पाटील यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे, हिंगोली लोकसभा प्रभारी रामदासजी पाटील, तालुकाध्यक्ष माणिक लोडे, शहराध्यक्ष कैलासचंद्र काबरा, प्रशांत सोनी, हमीदभाई प्यारेवाले, नंदू तोष्णीवाल, दिलीप चव्हाण, सुरेश सराफ, अनिल शेठ नैनवाणी, विश्वासराव नायक, मामूद बागवान, प्रकाश थोरात, आदी मान्यवर उपस्थित होते.
शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना त्वरित आणि योग्य उपचार तसेच सर्व सुविधा विनासायास मिळाव्या यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे या निवडीनंतर निनाजी कांडेलकर यांनी सांगितले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा