वैजापूर तालुक्यात पाणी फाउंडेशन व से ट्रीज संस्थेचा उपक्रम
शिवशाही वृत्तसेवा, वैजापूर जिल्हा प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी
आज दि ३०/12/2023रोजी वैजापूर तालुक्यातील शिवुर येथील गजानन महाराज मंदिर संस्थान या ठिकाणी बळहेगाव तलवाडा आघुर जरुळ टुणकी नालेगाव खंडाळा शिवुर या ११गावातिल एकुण 135 शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले प्रशिक्षणातुन शेतकऱ्यांचेआर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी बांधावर फळझाडे लागवड कसे करावे खड्डे कसा खोदावा लागवड कशी करावी संगोपन कसे करावे किड नियंत्रण व विक्री व्यवस्थापन कसे करावे हे या प्रशिक्षणातुन शेतकरी यांना मार्गदर्शन करण्यात आले.
फार्म कप गट शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी *पाणी फाउंडेशन व से ट्रिज* *संस्थेच्या चैतन्य जोशी (सेट्रीज फाउंडेशन बंगलौर) ,वृषभ माडवे(Twj अॅग्रो),सोमनाथ चव्हाण(प्रशिक्षक),ओम गिरी (समन्वयक सेट्रीज विदर्भ),पंकज घाडगे, अतुल चव्हाण, पराग माने, सुमित शिंदे यानी बांधावर फळझाडे लागवड केल्यामुळे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी मदत होईल व प्रत्यक्ष वअप्रत्यक्ष फायदे बघितले तर पावसाळ्यात सुपिक माती वाहुन जाणार नाही वादळ वारे पासुन पिकाच रक्षण मित्र पक्षासाठी घरटी तयार होईल पक्षी संवर्धन होईल किड नियंत्रण होईल असे असंख्य फायदे या प्रशिक्षणातुन शेतकऱ्यांना संदेश देण्यात आला*नंतर सर्व शेतकरी गटानी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा