प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी गावात उत्फुर्त प्रतिसाद.
शिवशाही वृत्तसेवा, सोयगाव जिल्हा प्रतिनिधी रईस शेख
-22 जानॆवारी 2024 रॊजी आयॊध्या यॆथील प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रण अक्षता कलशाचे दॆऊळघाट ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. रविवार दिनांक 31 डिसेंबर सकाळी आठ वाजता अक्षता कलशाच्चा भव्य मिरवणुकीला मारुती व विठ्ठल मंदिर संस्थान देऊळघाट पारंपारिक वाद्य व टाळ मृदुंगाच्या गजरातह संपूर्ण गावातून जय श्रीराम च्या घोषणा देत व भजन गात ही मिरवणूक भक्तीने वातावरणात पार पडली या मिरवणुकीत भजनी मंडळातील सर्व सदस्य गावातील सर्व माता भगिनी सर्व श्रीराम भक्त ग्रामस्थ लहान मुलांनी उत्कृष्टपणे सहभाग नोंदविला कलश यांची मिरवणूक पालखीतून काढण्यात आली यावेळी उबाळे सर यांनी उपस्थित श्री राम भक्तांना राम नामाचे महत्त्व राम मंदिराच्या उभारणीमागील संघर्ष तशीच 22 जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी ह.भ .प गजानन महाराज देशमुख, ह भ प रामेश्वर महाराज. ह भ प शंकर महाराज सोनूने .बंडु महाराज .विजय महाराज देशमुख. सुभाष संत उध्दव महाराज. गजानन बाप्पु देशमुख राजेश पाठक .सांडु पाटील.देवाजी अप्पा पन्हाळे.मधुकर कचौरे. विकास देशमुख सुभाष पुरी नंदु लवंगे कैलास भोरसे पंडितराव देशमुख दिलीप खराडे बबन पाटील छोटु काळकर नंदू पाटील अमित जयस्वाल शरद भोरसे नितीन पाटील अक्षय जाधव विशाल राऊत शाम सपकाळ सोनू गामणे गोपाळ जाधव विजय हिवाळकर गजानन हिवाळकर दिनेश घटटे अभिलाष जयस्वाल संदिप काळकर स्वप्नील देशमुख मनोहर पाटील राजु पाटील 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातही गावातील श्रीराम मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे त्यातही आपण सर्वांनी असाच सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री गजानन बाप्पु देशमुख यांनी केले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा