बोपर्डीच्या टोळीवर गुन्हा दाखल
मांढरदेवीची यात्रेचा हंगाम सुरू असतानाच रात्री १०|३० वाजण्याच्या सुमारास बोपर्डी येथील दहा ते बारा तरुण हातात लोखंडी सळई दगडी घेवुन तेथील हॉटेल स्वराज मध्ये घुसुन हॉटेल चालकांना ठार मारण्याचा उद्देश डोक्यात ठेवून महिला व पुरूषांना अमानुष पणे मारहाण करण्यास सुरवात केली त्यात महिला पुरुषांनसह आठ ते दहा जण गंभीर जखमी झाले आहेत .त्यांना उपचारा साठी वाईच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे .
या गंभीर घटनेची माहिती वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांना समजताच त्यांनी तातडीने गंभीर दखल घेवुन आपले सहकारी पोलिस उपनिरिक्षक के .डी .पवार महिला हवलदार सौ. शितल साळुंखे राहुल भोईर विशाल येवले यांना सोबत घेऊन मोडतोड केलेल्या हॉटेल स्वराजची पाहणी करुन जखमींना ऊपचारा साठी वाईच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवुन वाई पोलिस ठाण्यात येऊन बोपर्डीच्या तरुण टोळीवर वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पोलिसांचे एक पथक त्या तरुण टोळीचा शोध घेत .मांढरच्या आई काळुबाईची यात्रा शांततेत सुरु असतानाच तेथील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न बोपर्डीच्या तरुणांनी केल्याने वाई पोलिसांन मध्ये संतापाची लाट पसरली आहे .
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा