गावात धूर फवारणी करण्याची नागरिकांनी केली मागणी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे ग्रामपंचायत च्या वतीने धूर फवारणी करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन शेख रसूल मखनसाब युवक काँग्रेसचे अल्पसंख्यांक तालुका उपाध्यक्ष यांनी ग्रामविकास अधिकारी यांना मागणी करून एक महिन्याचा कालावधी लोटला, तरीही ग्रामसेवक व ग्रामपंचायत च्या वतीने कोणतेही धूर फवारणी व मलेरियाचे डास प्रतिबंधक फवारणी करण्यात आली नाही. ग्रामसेवक नागेश येरसनवाड यांना विचारणा केले असता ते आरोग्य क विभागाचे काम आहे असे सांगुन उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची माहीती दिली आहे.
त्यामुळे कुंटूर येथील कु. शिवानी नागनाथ कोटमाड वय वर्षे 14 ईयत्ता आठव्या वर्गात शिकत असलेल्या मुलीचा मृत्यू झाला कुंटूर मध्ये सर्वत्र घाण नाली चे पाणी रस्यावरूनच वाहत आहे यामुळे डासाची उत्पत्ती होऊन नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक होत आहे.
डास उत्पत्ती रोखण्यासाठी धुर फवारणी व नालीमध्ये जंतुनाशक लिक्वीड टाकून स्वच्छता करण्यात यावी, नागरिकामधे डेंगूची सात पसरली तर आरोग्यास धोका निर्माण होईल अशी भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करा आसी मागणी शेख रसूल मखनसाब यांनी केली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा