सुरक्षेच्या दृष्टीने बाळगली जात आहे सावधगिरी
जिल्हा पोलीस दलाच्या बॉम्बशोधक व नाशक पथकामार्फत जिल्ह्यातील गर्दीच्या ठिकाणी नेहमीच तपासणी केली जाते. हिंगोली बस स्थानक, रेल्वे स्टेशन, व इतर गर्दीच्या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी केली जात आहे. हिंगोली बस स्टँड स्टॅन्ड मध्ये श्वानपथकाच्या सहाय्याने तपासणी केली. गर्दीच्या ठिकाणी प्रवासांच्या बॅग, कचरा पेट्या, दुर्लक्षित जागा या ठिकाणी बॉम्ब शोधक श्वानपथकाच्या सहाय्याने तपासणी केली. ही एक रुटीन तपासणी असून सुरक्षेच्या दृष्टीने सावधगिरी बाळगणे हा हेतू असल्याचे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी सांगितले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा