सुजात आंबेडकर उपस्थित राहणार
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
वंचित बहुजन आघाडी जिल्हा नांदेड ( दक्षिण ) च्या वतीने लोहा येथील व्यंकटेश मंगल कार्यालय मैदानावर दि.२१ डिसेंबर रोजी सायंकाळी:- ४ वाजता, भव्य निर्धार मेळावा होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित होणाऱ्या मेळाव्याच्या अनुषंगाने दि.२१ डिसेंबर २०२३ दुपारी १ वाजता, ठिकाण:- माता रमाई चौक सिडको ते लोहा, भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात येणार आहे.
या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी दि.१८ डिसेंबर २०२३ रोजी सोमवार, नायगाव तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक नायगाव तालुका पक्ष निरिक्षक भिमराव बेद्रिकर, यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळीं, वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड (दक्षिण) जिल्हा,उपाध्यक्ष, दिपक माधवराव गजभारे घुंगराळेकर, तालुका महासचिव साहेबराव कोपरेकर, तालुका उपाध्यक्ष, सतिश वाघमारे, तालुका उपाध्यक्ष, प्रभाकर घंटेवाड, सर्कल प्रमुख मुरली भद्रे, शिवाजी पवार, गौतम सुर्यवंशी, नायगाव माधव गायकवाड, विठ्ठल पवार, संभाजी सुर्यवंशी, घुंगराळा, सज्जन कदम बेंद्रिकर, किरन इंगळे होटाळा, कपिल भद्रे होटाळा, व आदी पदा आधिकारी कार्येकर्ते उपस्थित होते.
नायगाव तालुक्यातुन बहुसंख्य कार्यकर्ते मेळाव्यास उपस्थित राहतील, या दृष्टीने प्रचार यंत्रणा राबविण्यात येईल अशी ग्वाही पदाधिकाऱ्यांनी दिली. वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड ( दक्षिण ) चे जिल्हा,उपाध्यक्ष, दिपक माधवराव गजभारे घुंगराळेकर.व ता.महासचिव साहेबराव कोपरेकर, ता.उपाध्यक्ष, सतिश वाघमारे, यांनी बैठकीस मार्गदर्शन करून मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन केले. बैठकीचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन शिवाजी पवार पेंटर कूंटूर सर्कल अध्यक्ष तर आभार प्रदर्शन मुरली भद्रे यांनी केले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा