माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते नियुक्ती
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)कामगारांचे प्रश्न सुटले पाहिजे या हेतूने नांदेड जिल्हा असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसच्या पदाधिकार्यांचे वतीने जिल्हा काँग्रेस कार्यालय येथे मेळावा घेण्यात आला यावेळी नायगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ.महानंदा गायकवाड यांची माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते काँग्रेस पक्षाच्या कामगार एव कर्मचारी पदाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली यामुळे महानंदा गायकवाड यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून वाटसप व फेसबुकवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
नांदेड येथे जिल्हा असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेस पदाधिकार्यांचे वतीने जिल्हा काँग्रेस कार्यालयत एक मेळावा घेण्यात आला याच कार्यक्रमात सौ.महानंदा गायकवाड यांची काँग्रेस पक्षाच्या कामगार एव कर्मचारी पदाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली सदर निवड राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे.
यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील शिंदे,डॉ.मीनलताई पाटील खतगावकर, माजी आमदार अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील शिंदे नागेलीकर, असंघटित कामगार जिल्हाध्यक्ष सादिक मरखेलकर, माजी सभापती किशोर स्वामी, सेवादलचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव धर्माधिकारी, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष गंगाधर सोनकांबळे, रास्त भाव धान्य दुकान परवानाधारक संघटनेचे विभागीय अध्यक्ष अशोक एडके, शाहुराज गायकवाड, पृथ्वीराज गच्चे, माली पाटील, रवी कांबळे, वनिता कांबळे, जनाबाई डूबुकवाड, रावसाहेब कांबळे, मंगलसिंग परमार यांच्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य असंघटित कामगार संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा