श्री ओंकारेश्वर महादेवाची प्रतिष्ठापना आणि कलशारोहण
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली शहरातील श्रीहरिओम सत्संग मंडळ व सर्व व्यापारी बंधू यांच्या वतीने संकट मोचन हनुमान मंदिर परिसरातून आज भव्य कलश यात्रा काढण्यात आली. हि कलश यात्रा शहरातील संकट मोचन हनुमान मंदिर, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, गांधी चौक, महावीर चौक, मेडिकल लाईन, कपडा गल्ली, सातमाता मंदिर ते पुन्हा संकट मोचन हनुमान मंदिर पर्यंत काढण्यात आली. 21 डिसेंबर रोजी संकट मोचन हनुमान मंदिर परिसरात श्री ओंकारेश्वर महादेवाची स्थापना आणि कलशारोहणचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
त्या अनुषंगाने भव्य कलश यात्रा काढण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येने महिला पुरूषांची उपस्थिती होती. 19, 20आणि 21 डिसेंबर या तीन ही दिवसी विविध धार्मिक विधी व पुजाआर्च करण्यात येत आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन श्री हरिओम सत्संग मंडळ व सर्व व्यापारी बंधू हिंगोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा