देऊळगाव मही येथे पार पडले झेप साहित्य संमेलन
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
(संत चोखामेळा साहित्य नगरी) देऊळगाव मही येथे दिनांक 17 डिसेंबर २०23 ला अनेक मान्यवर व कवी, साहित्यिक यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले.
या संमेलनाच्या निमित्ताने विविध वैचारिक कार्यक्रमांची रेलचेल होती त्यामध्ये ग्रंथदिंडी, हस्तकला प्रदर्शन, भारतीय समाज आणि लोकशाहीचे भवितव्य या विषयावर वरील संवादांमध्ये भाई अशांत वानखेडे यांनी मौलिक विचार व्यक्त केले. लोक महोत्सवामध्ये अभिनेत्री डॉक्टर रेणू जोशी यांनी नृत्य सादर करून प्रेक्षकांचे लक्ष वेधले. कथाकथन, कवी संमेलनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
उद्घाटन प्रसंगी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार संमेलनाचे उद्घाटक माननीय राजेंद्रजी शिंगणे साहेब, मा.मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा