राहुल शहांवर रमेश जोशींचे गंभीर आरोप
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालय या संस्थेत २०-२१ जून २०२३ रोजी नोकर भरतीसाठी मुलाखती घेण्यात आल्या. ही प्रक्रिया अत्यंत बेकायदेशीर, चुकीच्या व सदोष पध्दतीने राबविली गेली. कोणाला नोकरीवर घ्यायचे हे अगोदर ठरवून लाखोंचा घोडेबाजार झाला आहे. या प्रकरणी भरतीचे मुलाखतीचे कॉल लेटर ३ जून रोजी पाठविण्यात आले होते, मात्र त्यापुर्वीच ३१ मे २०२३ रोजी ॲडव्होकेट रमेश जोशी यांनी लेखी निवेदन देऊन विषयवार कोणाला घ्यायचे ठरले आहे.
त्या नावासह विद्यापीठाचे कुलगुरु, शिक्षण संचालक, मुख्यमंत्री, राज्यपाल, जिल्हाधिकारी या सर्वांना कळविले होते. त्यानंतर १४ जून रोजी माननीय कुलगुरुंना समक्ष भेटून सर्व स्पष्ट षडयंत्राची कल्पना दिली आणि स्मरणपत्र दिले. तरी देखील आधीच ठरलेल्या नावाच्या शिफारशी निवड समितीने केल्या असतील तर घोडेबाजार झाल्याचे सिध्द होत आहे. त्यामुळे योग्य उमेदवार डावलले गेले. पर्यायाने कॉलेज, व विद्यार्थ्यांच्या पुढील पिढीचे नुकसान होणार आहे. त्यामुळे सरस्वतीच्या प्रांगणात गालबोट लागू नये म्हणून सदर भरती प्रक्रीयाच रद्द करावी
त्याचबरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती मधील रक्कम प्राचार्यांनी परस्पर काढून वापरली व त्यानंतर परत विद्यापीठाला भरली. हा सरकारी रकमेचा अपहार आहे त्यामुळे संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी.
आणि संस्थेच्या अध्यक्षांची नेमणूक देखील बेकायदेशीर पद्धतीने केली असून विद्यमान अध्यक्ष शुभदा शहा यांची नेमणूक झालेली अनेक सभासद व संचालकांना माहीतच नव्हते. अध्यक्ष निवडीच्या वेळी अनेक सभासद संचालकांच्या सह्या बनावट असून सह्या केलेल्या लोकांना देखील अध्यक्ष बदलांचा ठराव झाल्याचे माहीत नव्हते त्यामुळे अध्यक्षांची निवड बेकायदेशीर असून ती रद्द करावी
अशी मागणी तक्रारदार एडवोकेट रमेश जोशी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा