महिलांची छेड काढणाऱ्यांवर केली कारवाई
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली दामिनी पथकाच्या वतीने 17 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील 51 ठिकाणी भेटी देऊन सहा टवाळखोरांवर कारवाई केली. जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, बस स्टँड, रेल्वे टेशन, गार्डन, इत्यादी ठिकाणी महिलांची छेड, तसेच विविध ठिकाणी विनाकारण आरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी दामिनी पथकाची नियुक्ती केली आहे.
11 डिसेंबर ते 17 डिसेंबर पर्यंत दामिनी पथकाने ५१ ठिकाणी फिरून पाहणी केली. सात जणांवर महाराष्ट्र पोलीस कायद्या नुसार कलम 110, 117 प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करून समज देऊन त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे पोलीस हवालदार सरनाईक आरती सावळे अर्चना नखाते चंद्रकांत देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा