40 वर्षापासून शेतऱ्यांना चिखल तुडवत प्रवास
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंतुरकर)
नायगाव तालुक्यातील कुंटूर ते जय अंबिका कारखान्याकडे जाणाऱ्या तीन किलोमीटर जिल्हा परिषद रस्त्याचे काम गेल्या 40 वर्षापासून कोणीही लक्ष दिले नसून जिल्हा परिषद पद हे कुंटूर येथील विद्यमान लोकप्रतिनिधी कडे होते मात्र त्यांनी ह्या रस्त्याकडे लक्षही दिले नसल्याची ओरड सध्या शेतकऱ्यातून सुरू आहे. कुंटूर येथे गावापासून कुंटूर पोलीस स्टेशनच्या पासून ते जय अंबिका सहकारी साखर कारखान्याकडे जाणाऱ्या तीन किलोमीटरचा रस्ता शेतकऱ्यांसाठी व रुई बुद्रुक कारखान्याकडे जाणाऱ्या लोकांसाठी अत्यंत सोयीचा आहे.
या रस्त्यावर हजारो शेतकरी महिला पुरुष येजा करत असतात. दररोज येजा सुरू असते मात्र ह्या रस्ता सध्या पांदण रस्त्यापेक्षाही वाईट परिस्थिती असून या रस्त्याला निधी देऊन रस्त्या दुरुस्ती करून रस्त्याला डांबरीकरण करण्यात यावी अशी मागणी शेतकरी श्री जगजीराव कदम कुंटुरकर यांनी आमदार राजेश पवार यांच्याकडे, गेल्या सहा महिन्यापासून केली आहे. त्यांनी आमदार राजेश पवार यांच्याकडे लेखी पत्र देऊन कुंटूर ते जय अंबिका कारखान्या यांच्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक किलोमीटरचा रस्ता तरी बनवून देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली असून आमदार राजेश पवार अशी पाहू करू अशी घोषणा दिली मात्र आजपर्यंत ह्या रस्त्याला कोणताही निधी मिळाला नाही.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडूनही कुंटूर ह्या रस्त्याला निधी मिळाला नसून आमदार व जिल्हा परिषद सदस्य कुंटूर यांनी परिसरात व तालुक्यात कित्येक ठिकाणी निधीची लाखो रुपयांची उधळण केली आहे. मात्र गरीब शेतकरी व मजूरदार लोकांसाठी चांगला रस्ता बनवण्याची त्यांना इच्छा नाही का असा प्रश्न कुंटूर येथील शेतकऱ्यांनी केला आहे . आमदार राजेश पवार व जिल्हा परिषद प्रतिनिधी राजेश कुंटूरकर दोघांनी लक्ष देऊन कुंटूर येथील एक किलोमीटरचा रस्ता तरी शेतकऱ्यांना चांगला पायी चालण्यासाठी तरी बनवून देण्यात यावा अशी मागणी होत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा