समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
विश्वकर्मीय समाज बांधवांच्या सामाजिक जाणिवेतून समन्वय विचाराने व सहकार्याने निर्धारित समाज ध्येयावर वाटचाल करत सामाजिक एकतेचे व दिशादर्शक कार्याचे अवलोकन व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय समाज समन्वय समितीच्या 5 व वर्धापन दिनानिमित्त आळंदी देवाची येथे येत्या २४ डिसेंबर २०२३ रोजी भव्य राज्यस्तरीय समाज मेळावा आयोजित करण्यात आला असून या समाज मेळाव्यात राज्यभरातील सर्व सुतार समाज बांधवांनी सहपरिवार सहकुटुंब वेळ रविवारी दिनांक 14 डिसेंबर २०२३ रोजी सकाळी 9.00 वाजता सहभागी व्हावे.
असे आव्हान महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय समाज समन्वय समिती कार्यकारी संचालक विद्यानंद मानकर व सुदर्शन बोराडे विश्वकर्मा विकास महामंडळ युवा अध्यक्ष यांनी केले आहे. समन्वय समितीच्या माध्यमातून लातूर येथे प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन समाज जागृती करताना विश्वकर्मीय विकास महामंडळ युवा अध्यक्ष सुदर्शन बोराडे व जिल्हाध्यक्ष भागवत पांचाळ यांनी 24 डिसेंबर देवाची आळंदी येथे होणाऱ्या सुतार समाज मेळाव्यास सर्व समाज बांधवांनी सहकुटुंब सहपरिवार सोबत उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा