१८ व्या वार्षिक संमेलनात पुरस्काराचे होणार वितरण
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतिक सोनपसारे)
सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी प्रवीण गीते यांना राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. भारतातील पहिल्या पत्रकार मित्र संघटन म्हणजेच ऑल जर्नालिस्ट ऍण्ड फ्रेंड्स सर्कल ह्या संघटनेचा सामाजिक क्षेत्रातील “राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार २०२३” हा सामाजिक कार्य करणाऱ्या संघटनांना आर्थिक, साहित्यरुपी तसेच इतरही बाबीत मदत करणाऱ्या प्रवीण बाबुराव गीते यांना जाहीर करण्यात आला आहे.
ऑल जर्नालिस्ट ऍण्ड फ्रेंड्स सर्कल ह्या राष्ट्रव्यापी पत्रकार संघटनेच्या नांदेड येथील पीपल्स कॉलेजच्या नरहर कुरुंदकर सभागृहात होणाऱ्या १८ व्या वार्षिक संमेलनात पुरस्काराचे वितरण होणार आहे.
ऑल जर्नालिस्ट व फ्रेंड्स सर्कल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल यांच्यासह गणेश कोळी, बाळकृष्ण कासार, प्रा. साहेबराव बेळे, प्रदेश संघटक नितीन गुंजाळकर यांनी ह्या संदर्भातील पत्र प्रकाशित करीत घोषणा केली आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या प्रवीण गीते ह्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याने, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा