नाते संबंधाच्या रेशीमगाठी जुळवण्याच्या उदात्त हेतू
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
मराठा सेवा नायगावच्या काळाची गरज ओळखून नाते संबंधाच्या रेशीमगाठी जुळवण्याच्या उदात्त हेतूने रविवार दि 24 डिसेंबर रोजी भव्य मराठा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, मराठा सेवा संघ नायगाव च्या वतीने मागील दोन वर्षांपासून काळाची गरज लक्षात घेऊन मराठा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. यंदाचे या मेळाव्याचे तिसरे वर्ष आहे. या वर्षी रविवार दि. 24 डिसेंबर 2023 रोजी शहरातील साईतीर्थ मंगल कार्यालय शेळगाव रोड नायगाव येथे सकाळी 10:00 वाजता या वधू-वर परिचय मेळाव्यास प्रारंभ होणार असल्याची माहिती मराठा वधू वर परिचय मेळावा संयोजन समिती व मराठा सेवा संघ नायगावच्या वतीने कळविण्यात आली आहे. .
मागील तीन वर्षापासून मराठा वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन अगदी मोफत विनामूल्य केले जाते. समाजातील वधू-वरांचा परिचय व्हावा यातून समाजातील मुलां व मुलींची नातेसंबंध जुळून यावेत. जीवनाच्या रेशीमगाठी बांधल्या जाव्यात... या उदात्त उद्देशाने या मराठा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळाव्यास सर्व क्षेत्रातील मराठा समाजातील मान्यवरांना निमंत्रित ही करण्यात आले आहे. तरी सर्व इच्छुक वधू-वर यांनी 9423306149, 9423137846, 9158400892, 9404787344, 9421519917, 9158400699, 9405772020, 7972134344, 9423659399 या दिलेल्या मोबाईल नंबर वर आपली नोंदणी करावी .असे आवाहन मराठा सेवा संघ तालुका शाखा नायगाव मराठा वधू-वर परिचय मेळावा संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा