अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून पंढरी नगरीत पंडित श्री.प्रदीप मिश्रा यांचे भव्य शिव महापुराण कथेचे आयोजन

रविवारी शहरात निघणार भव्य प्रदक्षिणा यात्रा
abhijit patil, pandit pradip misra, shivmahapuran, shivshahi nnews , pandharpur, solapur,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या माध्यमातून कायमच नवनवीन उपक्रम राबवत असताना आपल्याला दिसून येते. कधी छत्रपती संभाजी महाराज यांचे महानाट्य तर कधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीला शिंदेशाही यांचा आदर्श शिंदे यांचा लोकगीतांचा कार्यक्रम तर कधी  छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पंढरपूर मंगळवेढा येथे शिव व्याख्यानाचे आयोजन तर कधी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन केलेले आपण सर्वांनी बघितले आहे परंतु प्रथमच अभिजीत पाटील यांनी सांप्रदायिक पंढरीत शिवमहापुराण कथेचे अयोजन चंद्रभागा मैदान डीव्हीपी स्क्वेअर समोर २५डिसेंबर ते ३१डिसेंबर पर्यंत सिहोरचे पंडित प्रदीप मिश्रा यांचे कथेचे आयोजन केले आले आहे.
पंढरपूर नगरीमध्ये आषाढी,कार्तिकी, माघी, चैत्री वारी सारखीच बरोबरच या कथेमुळे पंढरपूरमध्ये वारीचे स्वरूप निर्माण झालेले दिसून आलेले आहे. व्यापारी वर्ग, रिक्षावाले, हाॅटेल, महाप्रसाद दुकानदारांना यातुन चांगली आर्थिक उलाढाल होणार असल्याचे दिसून आले. दोन दिवस आधीच लाखोच्या संख्येने शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली दिसून आलेले आहे.  भाविकांच्या सोयीसाठी जवळपास चार एकरामध्ये मंडपाची सोय केलेली आहे. तरी ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, स्वच्छता, डाॅक्टर्स, मदत केंद्र कार्यक्रम ठिकाणी उभारणी केलेली आहे. या कथेमुळे पंढरपूरला वारीचे स्वरूप दिसून आलेले आहे. 
१८ पुराणांपैकी एक अत्यंत महत्त्वाचे असलेले पुराण म्हणजे शिवमहापुराण. पंढरपूर मध्ये या कथेचे आयोजन ही भाविकांसाठी अत्यंत पावन अशी पर्वणी ठरणार आहे.. पंढरपूर व पंचक्रोशीतील सुमारे १० लाख भाविक या कथेचा लाभ घेण्यासाठी येण्याची शक्यता असून त्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे. श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या संकल्पनेतून पुढे आलेला हा एक अत्यंत उत्कृष्ट उपक्रम असून पंढरपूर नगरीतील भाविकांना या निमित्ताने सुप्रसिद्ध पंडित श्री.प्रदीपजी मिश्रा महाराज यांच्या मुखातून प्रत्यक्ष हा सोहळा अनुभवायला मिळणार आहे.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !