श्री सद्गुरु सेवा समितीच्या प्रसिद्धी प्रमुख पदी राकेशजी भट्ट यांची निवड
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
हिंगोली शहरातील दैनिक भास्कर जिल्हा प्रतिनिधी, समाज व धर्म कार्यात अग्रेसर असणारे राकेशजी भैय्या यांच्या कार्याची दखल घेत श्री सद्गुरु सेवा समितीच्या प्रसिद्धी प्रमुख पदी राकेशजी भट्ट यांची निवड करण्यात आली आहे. पुरातन संस्कृती प्रमाणे वेद मंत्रानी आशीर्वाद देत प्रसाद रूपी श्री फल देण्यात आले आहे.
या वेळी राजेंद्र शुक्ल, नंदकुमार विडोळकर, भालचंद्र इंचेकर,जयंत देशमुख , धोंडीराज पाठक, सुधीर कुलकर्णी, चैतन्य देशपांडे, सर्वेश शुक्ल , संजय मेथेकर, अथर्व देशमुख तसेच श्री सद्गुरु सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष वेद शास्त्र संपन्न श्रीविघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिर पुजारी लक्ष्मीकांत पाठक, यांच्यासह श्री सद्गुरु सेवा समितीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते..
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा