श्री दत्त जयंती महोत्सव निमित्ताने दत्त मंदिरात कार्यक्रम
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली , जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
हिंगोली : शहरातील शिवाजी नगर भागामधील दत्त मंदिरात श्री दत्त जयंती महोत्सव निमित्ताने आज २५ डिसेंबर सोमवार रोजी छत्रपती संभाजी नगर येथील कु. सावनी शिरीष गोगटे हिच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
श्री दत्त जयंती महोत्सव व श्री गुरूचरित्र पारायण सोहळा २० ते २६ डिसेंबर या कालावधीत शिवाजी नगरातील श्री दत्त मंदिर देवस्थानमध्ये आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त दररोज सकाळी श्री गुरू चरित्र पारायण, सायंकाळी महिला मंडळातर्फे विष्णु सहस्त्रनाम, गिताअध्याय १२,१५ चे वाचन व सायंकाळी ६ ते ७ दरम्यान श्री दत्त पंचपदी असे धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत. यासोबतच रात्री अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त आज २५ डिसेंबर सोमवार रोजी सायंकाळी ७.३० ते १० वाजेपर्यंत छत्रपती संभाजी नगरातील कु. सावनी शिरीष गोगटे हिच्या भक्तीगितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तिच्यासोबत तबला वादक छत्रपती संभाजी नगरातील श्री दत्तात्रय माणिकराव गोगटे व हार्मोेनियमवर नागोराव देशपांडे लोहगावकर हे साथ करणार आहेत. या संगीत कार्यक्रमास रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री दत्त मंदिर संस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे. कु. सावनी गोगटे हिचे गायनाचे कार्यक्रम यापुर्वी अनेक ठिकाणी सादर झाले आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा