सरपंच तथा बाजार समिती संचालक शिंदे गटात
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
औंढा नागनाथ येथील पिंपळदरीच्या अनेक गाव पुढारी व कार्यकर्त्यांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला आहे. पिंपळदरी येथील सरपंच तथा आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय भुरके यांच्यासह पंचायत मधील अनेक सदस्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला आहे
कळमनुरी विधानसभाचे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली शासकीय रेस्ट हाऊस येथे झालेल्या छोट्याशा कार्यक्रमात अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, बाजार समिती संचालक, पंचायत समिती सदस्य यांच्यासह स्पर्धे दीडशे कार्यकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अतिशय चांगले काम करत असून महाराष्ट्रातील जनता त्यांच्या कामावर समाधानी आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात व आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही आज शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे मत या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा