अपघातात दोन विद्यार्थी गंभीर जखमी
सोलापूर शहर प्रतिनिधी , जगदीश कोरीमठ, शिवशाही न्यूज, सोलापूर
सोलापूर येथे महाविद्यालयीन विद्यार्थिनी असलेल्या रिक्षाला भरधाव वेगाने येणाऱ्या कारणे धडक दिली आहे या अपघातात रिक्षातील तीन पैकी एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत झाला आहे तर दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत. शनिवार दिनांक 23 डिसेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर विद्यापीठ समोर ही दुर्दैवी घटना घडली. भाग्यश्री निवृत्ती कांबळे वय 17 अकरावी शिकणारी विद्यार्थिनी मृत्यूमुखी पडली आहे.
रिक्षा क्रमांक एम एच १३ सीटी 94 79 सोलापूरकडे निघाला होता यावेळी राष्ट्रीय महामार्गावर विद्यापीठाच्या समोर पुण्याकडून सोलापूर कडे जाणाऱ्या कारणे या रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती बसलेली की रिक्षात बसलेली भाग्यश्री कांबळे ही रिक्षातून सर्विस रोडवर फेकली गेली यामध्ये ती गंभीर जखमी झाली आणि तिचा दुर्दैवी अंत झाला. त्याचबरोबर तिच्यासोबत रिक्षाला असलेल्या ऐश्वर्या जगन्नाथ सोडगी व दुसरा विद्यार्थी आदित्य सुनील भोसले हे दोघे देखील गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात भरती केले आहे अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी जखमींना मदत करत रुग्णालयात दाखल केले होते मात्र उपचारापूर्वीच भाग्यश्रीचा अंत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. भाग्यश्री चे वडील हे शासकीय सेवेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी असून भाग्यश्रीला एक बहीण देखील आहे या दुर्दैवी घटनेमुळे कोंडी परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा