शेंदुर्जन गावावर शोककळा, एकाच वेळी पेटल्या तिघांची चीता
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेडराजा तालुक्यातून पुन्हा समोर आली धक्कादायक बातमी
काल साखरखेर्डा येथील सूतगिरणी जवळ प्रेमीयुगलाने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना उजेडात आली होती. दरम्यान आता अल्पवयीन मुलीसोबत आत्महत्या केलेल्या गोपालच्या वडिलांनी देखील गळफास घेतला आहे, त्यामुळे बापलेंकावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ शेंदुर्जन वासियांवर आली आहे.
८ व्या वर्गात शिकणारी १३ वर्षीय मुलगी आणि २२ वर्षीय गोपाल समाधान खिल्लारे १८ डिसेंबर पासून बेपत्ता होता. साक्षीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून साखरखेर्डा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल होता.
दरम्यान काल, सायंकाळी साक्षी आणि गोपालचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसला होता. पोलिसांनी पंचनामा करून दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले होते. आज दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र आज सकाळी गोपालचे वडील समाधान खिल्लारे यांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशन च्या मागील बाजूला असलेल्या वस्तीतील एका पडक्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत, पुढील कारवाई सुरू आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा