मनोज जरांगे पाटलांनी मंत्री छगन भुजबळांना भरला दम
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
मराठा आरक्षणाचा विषय अंतीम टप्यात आला आहे. मात्र युवकांचे बळी गेले त्याला सरकार जबाबदार आहे. आम्ही तुमच्या साठी आरक्षण मागतोय तुमचा बळी गेला तरआरक्षणाचा उपयोग काय. नुसता आरडाओरडा करून चालणार नाही. वेढा आणि षढयंत्र तोडल्या शिवाय मराठ्याना गत्यंतर नाही, असे मत मनोज जरांगे पाटील यांनी नायगाव येथील सभेत व्यक्त केले आहे.
दि. 8 डिसेंबर रोजी नायगाव येथे मराठा संघर्ष योद्धा यांची सभा झाली. याप्रसंगी शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सभेपर्यंत त्याच्यावर पुष्पवृष्टी करून सभास्थळी 51 तोफांची सलामी देण्यात आली. यावेळी सभास्थळी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करून सभेला सुरवात केली. पुढे बोलताना त्यानी उपमुख्यमंत्री अजित पवार व छगन भुजबळ यांच्यावर ही जोरदार टीका केली. मराठा ही जात जगाचा पाठीवर शांत आहे, पन एखाद्याच्या पाठीमागे लगलो तर शांत बसनार नाही. आसा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. प्रत्येक आई वडीलांच स्वप्न पुर्णकरण्यासाठी ही संधी आली असून आपल्या पाठीशी कोणी नाही. हा लढा आपल्याला लढायचा आहे. शेती आपल्याला साथ देत नाही. निसर्ग पिच्छा सोडत नाही, शिकून घरी राहाणे परवडणारे नाही. आई वडीलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आपल्याला आरक्षणाशिवाय पर्याय नाही. अशी आपली गत झाली आहे. त्यामुळे जागे व्हा ही वेळ खुप मोलाची आहे. ऐकजुट व्हा. मराठा समाजाने व्यसनापासुन दूर रहा. दारु सोडा असे सांगीतले. महाराष्ट्र मराठ्याचा सातबारा असून येथील शाळा, महाविद्यालये, दवाखाने, बसस्थानक, सरकारी कार्यालये यास आपल्या जमीनी फुकट दिल्यात. हे सांगून छगन भुजबळांना चिमटा काढला. आता मराठ्यानी मुंबई येथे जाण्यासाठी तयार राहावे. असे आवाहन केले.
आरक्षण तर भेटु दे मग, तुला दाखवतो, तेव्हा आपण छगन भुजबळ हिसोब करु. असा टोला मंत्री छगन भुजबळ यांना लगावला. यांचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावरही आसूड ओढले. सत्तर वर्षापासुन मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून कालपासून मराठ्यांच्या ३५ लाख नोदीं सापडल्या असून सर्वाना आता जातीची प्रमाण पत्र मिळत आहेत. पण आपणास सरकट आरक्षण हवे आहे. ते मिळेपर्यत मी गप्प बसनार नाही, असे सांगत उपस्थित समुदायास संबोधित केले. सभेला लाखोंचा जनसागर उसळल्याने ही शहरातील पहिलीच विक्रमी सभा ठरली.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा