रस्ता न दिल्यास तंटामुक्ती अध्यक्ष हनीफ बागवान तीव्र आंदोलन करणार
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील बस स्थानक परिसरात सार्वजनिक मुत्रीघर आहे त्याला लागूनच खरेदी विक्री संघाचे गोडाऊन अतिक्रमणाच्या विळख्यात आले आहे येण्या जण्याच्या रस्त्याच्या जागेतच अतिक्रमण केल्याने लोकांना मोठी गैरसोय निर्माण झाली आहे मलकापूर हे बाजाराचे गाव असल्याने येथे नागरिक व प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते त्यामुळे सुलभ मुत्रीघर व्यवस्थीत असणे गरजेचे आहे या संदर्भात तंटामुक्ती अध्यक्ष हनीफ बागवान यांनी निवेदन देखील दिले आहे जर तात्काळ अतिक्रमण हटवण्यात आले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा