maharashtra day, workers day, shivshahi news,

पंढरपूर नगरपालिकेनी केलेली मालमत्ता कर वाढ रद्द करण्यासाठी सोमवारी मनसे आणि विठ्ठल परिवार याचा नगरपालिकेवर मोर्चा

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगरपालिकेवर सोमवारी  निघणार  मोर्चा : दिलीप धोत्रे 
Cancel the property tax increase, MNS and Vitthal family march on the municipality, pandharpur, solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
पंढरपूर नगर परिषदेने मालमत्ता कर वाढ भरमसाठ वाढ केल्याने या करवाढीला मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी तीव्र विरोध केला असून कर वाढी विरोधात सोमवारी पंढरपूर नगर परिषदेवर मोर्चा निघणार असल्याची माहिती मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुधीर धोत्रे, मा.नगरसेवक किरणराज घाडगे, महम्मद वस्ताद, लखन चौगुले, संतोष कवडे,आदित्य फत्तेपुरकर, शशिकांत पाटील, दत्ता भोसले आदी उपस्थित होते.
पंढरपूर नगर परिषदेने मालमत्ता करात मोठी वाढ केल्याने या कर वाढीला विरोध होत आहे. 
याबाबत शनिवारी पत्रकार परिषद घेऊन पंढरपुरातील नागरिकांना मालमत्ता कर न भरण्याचे आवाहन मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केले आहे.  यावेळी त्यांनी पंढरपूर नगरपालिकेवर अनेक वर्षांपासून सत्तेत बसलेल्या मंडळींनी कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याने आता नगरपालिकेची तिजोरी भरण्यासाठी व बगल बच्चे जगण्यासाठी हे षडयंत्र असल्याचा आरोप धोत्री यांनी केला. याबाबत सोमवारी नगरपरिषदेला जाब विचारण्यासाठी सर्वपक्षीय मोर्चा निघणार असून यामध्ये  सर्व पक्षातील नेते मंडळींनी पदाधिकाऱ्यांनी तसेच पंढरपूरकर नागरिकांनी सामील होण्याचे आवाहन धोत्रे यांनी यावेळी केले.करवाढ कशासाठी,पालिका प्रशासनास लाज कशी वाटत नाही ? पालिका प्रशासनास सवाल 
१) मागील ६ वर्षांपासून शहरातील दोन्ही बागा बंद होता,सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी मुलांच्या खेळण्या बागडण्याच्या आवाज बंद झाला,हा नाकर्ते पणा कुणाचा होता ? 
२) शहरात मागील अनेक वर्षांपासून अपुरा पाणी पुरवठा होत आला आहे,काही गल्ली बोळातून तर केवळ २०-२५ मिनिटे पाणी पुरवठा होतो,ऐन सणासुदीच्या दिवसात ड्रेनेजचे पाणी शहरातील नागिरकांना पाजले,गेल्या ७ वर्षात शहरातील जनतेला योग्य दाबाने आणि पुरेसा पाणी पुरवठा करू शकला नाही,मग करवाढ कशासाठी ? 
३) पंढरपूर शहरात जवळपास ४ हजार बेघर अथवा स्वतःच्या मालकीचे घर नसलेली कुटूंबे आहेत,स्वतः नगर पालिकेने केलेल्या सर्व्हेक्षणात हा आकडा उघड झाला आहे.प्रधानमंत्री आवास योजनेतून शहरातील बेघरांना घरे मिळावीत,झोपडपट्टी धारकांना आहे त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी असताना पालिकेची मोक्यावरील जमीन ठेकेदाराच्या घशात घालून आवास योजनेचे काम सुरु केले,त्या ठिकाणी घरांच्या किमती शहरातील खुल्या बाजारातील दरापेक्षा २ लाखांनी जास्त ठेवल्या,शहरातील झोपडपट्टी धारक जाचक नियम अटींची पूर्तता करू शकत नसल्याने त्यांना या चांगल्या योजनेचा लाभ मिळाला नाही,हे पाप कुणाचे ? हा डाव कुणाचा ? 
४) पंढरपूर शहरातील जवळपास सर्वच प्रमुख रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे,नगर पालिकेकडून करण्यात आलेले अनेक रस्त्यावर अवघ्या महिना-दोन महिन्यात खड्डे पडल्याचे दृश्य पाहावयास मिळत आले,बहुतांश रस्त्यावर धुळीचे साम्राज्य हे चित्र अनेक वर्षांपासून कायम आहे,मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी अनेकवेळा स्वखर्चाने विविध गल्ली बोळातील रस्त्यावरील खड्डे बुजविले,हे घडत असताना नगर पालिका प्रशासन मूग गिळून बसले मग आता करवाढ मागत असताना लाज कशी वाटत नाही ? 
५) शहरातील बाजारपेठ परिसर,भाजी विक्रीचे ठिकाण या ठिकाणी माता भगिनी घाणीतून मार्ग काढत भाजी खरेदी करताना दिसून येतात,पावसाळ्यात तर या ठिकाणी अतिशय वाईट परिस्थिती असते,शहरातील नागिरकांसाठी बाजारपेठ परिसर हे वर्दळीचे ठिकाण असतानाही या ठिकाणी घाणीचे साम्राज्य आणि पाण्याची डबके हे चित्र मागील अनेक वर्षे दिसत आले,व्यापारी, संघटनांनी वेळोवेळी मागणी करून,तक्रारी करून देखील याकडे पालिकेने दुर्लक्ष केले याची थोढीही खंत नगर पालिका प्रशासनास वाटत नाही का ? 
६) शहरातील हिंदू स्मशान भूमी,लींगायत स्मशानभूमीची अवस्था मागील अनेक वर्षांपासून वाईट आहे,या ठिकाणी अंत्यविधी करण्याचे कट्टे देखील उखडले गेले होते,पुरेशी प्रकाश व्यवस्था नाही,स्मशानभूमी सारख्या शेवटच्या ठिकाणी देखील नगर पालिका प्रशासन सुविधा पुरवू शकत नसेल तर करवाढ कुठल्या तोंडाने मागत आहे,मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी स्वखर्चाने स्मशान भूमितील दहन विधीचे कट्टे दुरुस्त केले,या ठिकाणी पेव्हर ब्लॉक टाकून दिले तेव्हा नगर पालिका प्रशासनास शहरातील नागिरकांच्या या समस्येबाबत थोडीही वाटली नाही का ? 
७) शहरातील नागरिकांकडून नगर पालिका प्रशासन वृक्ष कर घेत आले आहे,काही वर्षांपूर्वी नगर पालिकेने शहरात विविध ठिकाणी झाडे लावण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले,तसे टेंडरही काढण्यात आले होते.मात्र शहरातील बहुतांश रस्ते अजूनही उजाड आहेत,नगर पालिकेकडून शहरात कुठेही वृक्ष लागवड केली जात असल्याचे दिसून येत नाही,जी काही नव्याने लावलेली झाडे दिसून येतात ती विविध सामाजिक संघटनानी लावली आहेत,नगर पालिका प्रशासनाने याचा खुलासा करावा अशी मागणी  मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी केली आहे.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !