ग्रामपंचायत सदस्य यांचीय जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे विना कोटेशन एक मोटारी वरच पाच मोटारी चालवत आहेत वरील सर्व कुंटूर गावातील रहिवासी असून मोटार व कोटेशन आहे मी मोटर चालवतो पण त्याच डीपी वर एकूण 35 मोटारी चालत असून त्या डीपीवर अति मोटारी असल्यामुळे त्या डीपीवर लोड येत आहे. तरी गणपतराव सोमठाणे यांनी दोन फिटर ची लाईट एक एक करत दोन पोल ची लाईट एकत्र करून मोटारी चालवत आहे. वीज पुरवठा कमी असल्यामुळे माझी मोटर चालत नाही विना कोटेशन चालत असलेल्या मोटारीवर योग्य ते कारवाई करून माझा वीज पुरवठा सुरळीत करून देण्यात यावा अशी विनंती जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे केले आहे.
कर्मचारी पैसे घेऊन तुम्हाला काय करायचे ते करा मी तुमच्यासोबत आहे असा आदेश देऊन विना कोटेशन वाल्यांकडून पैसे वसूल करून बिनधास्त परवाना देऊन लाईटची सोय करून देत आहेत . लाईनमन जामवंत महागावे ,निरपणे लाईनमन हे कर्मचारी पैसे घेऊन बिनधास्त कोटेशन चा परवाना देऊन शासनाची दिशाभूल करून करत असल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य दत्ता विश्वनाथ नालीकंटे यांनी जिल्हा अधिकारी नांदेड यांच्याकडे तक्रार केली आहे.
मोटारी चालवत असल्याने पूर्ण उलटा रिटर्न सप्लाय रिप्लाय येत असून लाईट बंद होते आहे . लोड शेडिंग आहे म्हणून किंवा शेतकरी जर कोणी काम करत असतील तर जीवीत हानी होईल. तातडीने विज चोरी करणाऱ्या वर योग्य ती कारवाई करावी. चार चार मोटारी वापर करून शासनाची दिशाभूल करून वीज पुरवठा वापरला जात आहे याकडे सर्व लाईन मेन व जेई यांचे दुर्लक्ष होत असल्याचे तक्रार आहे. दत्तात्रय विश्वनाथ नांलिकंठे यांनी कार्यकारी अभियंता नांदेड व जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे तक्रार केली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा