maharashtra day, workers day, shivshahi news,

जिव्हाळा मातृत्वाचा हिरकणी कक्ष स्थापन

जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाचा अभिनव उपक्रम 
hirkani kaksh, Office of Women and Child Development, higoli, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली येथील जिल्हा महिला व बालविकास कार्यालयामध्ये स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. महिला व बालविकास कार्यालयाअंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो. बालसंगोपन योजनेचा प्रस्ताव सादर करण्यासाठी अधिक संख्येने लाभार्थी व स्तनदा माता येतात. तसेच कार्यालयामध्ये चाईल्ड लाईन अंतर्ग स्तनदा माता कर्मचारी आहेत. या व अशा इतर कार्यालयामध्ये हिरकणी कक्ष ‘जिव्हाळा मातृत्वाचा’ ही संकल्पना प्रत्यक्ष अंमलात आणली आहे. 
यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी माया सुर्यवंशी, सहाय्यक लेखाधिकारी कमल शातलवार, विधी सल्लागार विद्या नागशेट्टीवार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, कायदा तथा परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित, लेखापाल शितल भंडारे, चाईल्ड हेल्पलाईनच्या सुपरवायझर धम्मप्रिया पखाले, जिल्हाधिकारी कार्यालयातील ए.टी. दळवी, अलका कोकरे, छाया दराडे, सरल खंदारे, एम.आर. नरवाडे, कुसूम भिसे इत्यादी महिला कर्मचारी उपस्थित होते.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !