माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंत निमित्त अभिवादन

माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी वाहिली श्रद्धांजली
Atal Bihari Vajpayee, prashant paricharak, pandharpur, shivshahi news, solapur,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
भारतीय जनता पक्षाचे  ज्येष्ठ नेते, भारतरत्न आणि माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांची आज जयंती निमित्त मा.आ.प्रशांत परिचारक व पंढरपूर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी श्रद्धांजली वाहिली. स्वातंत्र्योत्तर काळात भारताचे अंतर्गत व परकीय धोरणास आकार देण्यात एक पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री, विविध स्थायी समित्यांचे अध्यक्ष व एक संसदीय विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी समर्थपणे भूमिका बजावली.
एका उल्लेखानुसार, अटल बिहारी वाजपेयी नावाप्रमाणेच अटल ज्येष्ठ भारतीय नेते, निष्णात राजकारणी, निस्पृह सामाजिक कार्यकर्ते, बलवान वक्ते, कवी, साहित्यिक, पत्रकार व खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. जनसामान्यांच्या आशा आकांक्षा वाजपेयी यांनी पूर्ण केल्या. त्यांच्या कार्यातून आजही त्यांची राष्ट्राप्रती असलेली निष्ठा प्रतीत होते.
“अटलजी हे एक दूरदर्शी राजकारणी, हुशार वक्ते, विद्वान साहित्यिक आणि एक ज्येष्ठ संसदपटू होते, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्राच्या निस्वार्थ सेवेसाठी समर्पित केले.” राष्ट्र उभारणीतील त्यांचे योगदान नेहमीच सन्मानाने लक्षात ठेवले जाईल, असेही ते म्हणाले. ज्येष्ठ संसदपटू असलेले अटल बिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते. वाजपेयी नऊ वेळा लोकसभेवर तर दोनवेळा राज्यसभेवर निवडून आले होते हाही एक प्रकारचा विक्रमच आहे. यावेळी पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतिशजी मुळे, भा.ज.पा. ज्येष्ठ कार्यकर्ता सेल प्रदेश अध्यक्ष सुरेशजी खिस्ते, अनिल अभंगराव, भास्कर कसगावडे, माऊली हळणवर, विक्रम शिरसट, गुरुदास अभ्यंकर, संजय निंबाळकर, अक्षय वाडकर, गणेश शिंगण, गजेंद्र माने, अंबादास धोत्रे, अनंत कटप, दादा कोळेकर, सूरज सोणवलकर, दिपक येळे, लाला पानकर, राहुल परचंडे, गुरू दोडीया, व्यंकटेश कौलवार, संदीप माने, ओंकार वाळूजकर, अमित मांगले, युवराज मुचलंबे, आबा पवार, भाऊ टमटम, रोहन पवार, सिद्धिविनायक विरधे, माऊली साळुंखे, विष्णू सुरवसे व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व युवक सहकारी मित्र उपस्थित होते.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !