होटाळा येथील सकल मराठा समाज बांधवांच्या 58 दिवसा नंतर साखळी उपोषणाला तात्पुरती स्थगिती

श्री मनोज पाटील जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा
Shri Manoj Patil Jarange , All Maratha community brothers , naigaon , nanded , shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव दि.२५.मराठा योद्धा श्री मनोज पाटील जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून होटाळा तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथील सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण दिनांक 30/10/2023 पासुन चालू होते या साखळी उपोषणाला काल बीड येथे झालेल्या इशारासभेत श्री मनोज पाटील जरांगे यांनी दिलेला आदेश सकल मराठा समाजाला मान्य आहे या हेतूने 20 जानेवारी 2024 रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर जाण्यासाठी पुढील दिशा ठरवण्यासाठी होटाळा तालुका नायगाव जिल्हा नांदेड येतील साखळी उपोषण सकल मराठा समाजाच्या वतीने तात्पुरते स्थगित करण्यात येत आहेत.
 तरी प्रशासनाने आजपर्यंत केलेले सहकार्य आणि गावकऱ्यांनी केलेले साखळी उपोषण हे शांततेत पार पडले असून येणाऱ्या काळात शासनाने सहकार्य करावे असे सकल मराठा समाज होटाळ्याच्या वतीने आज नायगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुठे साहेब व तहसील कार्यालय चे महसूल अधिकारी तलाठी बामणीकर साहेब यांच्या उपस्थितीत दिनांक 24/12/23 रोजी साखळी उपोषण साडेअकरा वाजता तात्पुरते स्थगित करण्यात येत आहे उपस्थित सकल मराठा समाज नायगाव तालुक्याच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते  उपस्थित होते.सकल मराठा समाज होटाळा यांनी अशी माहिती दिली आहे.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !