कृषी प्रदर्शन, सांस्कृतिककला महोत्सव - वसंत सुगावे पाटील यांची माहिती
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
घुंगराळा येथील श्री खंडोबा देवस्थानची यात्रा दिंनांक 18 डिसेंबर पासून सुरू होणार असून यात्रेत पूर्वापार परंपरेने चालत असलेले जंगी कुस्त्यांचे सामने, कृषी प्रदर्शन ,सांस्कृतीक कला महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशसरचिटणीस तथा गावचे प्रभारी सरपंच वसंत सुगावे पाटील यांनी दिली आहे.
यामध्ये दिं.18 डिसेंबर रोजी कुंटुर येथून पालखीचे घुंगराळा येथे आगमन होईल. त्यानंतर सायंकाळी खंडोबा मंदिरावर आंबील जेवणाचा कार्यक्रम होईल.दिं. 19डिसेंबर रोजी दुपारी जिल्हा परिषद हायस्कुल च्या मैदानावर जंगी कुस्त्या होतील या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन नांदेडचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री. धरणे साहेब यांच्या हस्ते व निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, नायगावच्या तहसीलदार मंजूषा भगत, यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहेत. तर सायंकाळी कुस्ती स्पर्धेचे बक्षिस वितरण पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते, अप्पर जिल्हाधिकारी बोरगावकर बिलोलीचे उपजिल्हाधिकारी सचिन गिरी, पोलीस उपअधीक्षक हनपुडे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या कुस्ती स्पर्धेत प्रथम बक्षीस वसंत सुगावे पाटील यांच्या तर्फे खंडोबा केसरी कै.माधवराव पाटील सुगावे यांच्या समरणार्थ 21,000 रुपये असून, द्वितीय बक्षीस 11,000 रुपये, तृतीय बक्षीस 7,777 रुपये आहे. दिनांक 20 डिसेंबर रोजी कृषीप्रदर्शन हा कार्यक्रम असून या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक तुबाकले साहेब यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.तर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारीश्री.बोधनकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या कार्यक्रमास जि. प. कृषी अधिकारी बेतिकर साहेब, जिल्हा कृषी अधीक्षक बराटे साहेब यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दिनांक 20 डिसेंबर रोजी संध्याकाळी 8.00 वा.जिल्हा परिषद हायस्कुल च्या मैदानावर सांस्कृतीक कला महोत्सव या मनोरंजक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 21 डिसेंबर रोजी संध्याकाळी पालखीचे कुंटुरकडे प्रस्थान होईल. तरी यात्राकाळातील या कार्यक्रमांस पंचक्रोशीतील भाविक भक्त, नागरिक, शेतकरी, युवक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशसरचिटणीस तथा प्रभारी सरपंच वसंत सुगावे पाटील यांच्यासह ग्रामसेवक शिंदे व यात्रा कमिटी यांनी केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा