maharashtra day, workers day, shivshahi news,

अल्पसंख्यांक समाजातील वंचित घटकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

अल्पसंख्यांक हक्क दिन उत्साहात साजरा

The disadvantaged in the minority community should benefit from the schemes of the government, hingoli, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिध चंद्रकांत वैद्य)
हिंगोली अल्पसंख्यांक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने अल्पसंख्यांक समाजासाठी विविध योजना राबवित आहे. याचा सर्व अल्पसंख्यांक समाजातील वंचित घटकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी केले.  
संयुक्त राष्ट्र संघटनेने 18 डिसेंबर, 1992 रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यांकांच्या हक्काचा जाहीरनामा स्वीकृत करुन प्रस्तूत केला होता. त्याकरिता दरवर्षी 18 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय अल्पसंख्यांक दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच अल्पसंख्यांक समाजास त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काची जाणीव व माहिती व्हावी याकरिता अल्पसंख्यांक विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी देखील 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून आयोजित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने  आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अल्पसंख्यांक हक्क दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.  यावेळी जिल्हाधिकारी जिंतेंद्र पापळकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी माधव सलगर, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, जैन समाजाचे कार्यकर्ते प्रकाश सोनी, अल्पसंख्यांक समाजाचे सामाजिक कार्यकर्ते निहाल भैया, शिक्षक तथा सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती वंदना सोवितकर, गुलाम नबी आझाद उर्दू शाळेचे शिक्षक शाहीद हुसेन, अल्पसंख्यांक वसतीगृह प्रतिनिधी श्रीमती मुनोजमा, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मिलींद यंबल यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अल्पसंख्यांक समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, अभ्यासिका यासह विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पुढे यावेत व शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचे लोककल्याणकारी काम करावे, असे आवाहनही केले. तसेच त्यांनी अल्पसंख्यांकासाठी राबविण्यात येणाऱ्या अल्पसंख्यांक मुलींचे वसतीगृह, डॉक्टर झाकीर हुसैन मदरसा अत्याधुनिकीकरण योजना, अल्पसंख्यांक शासनमान्य खाजगी शाळांना पायाभूत सुविधा, मौलाना अब्दुल कलाम आजाद आर्थिक विकास महामंडळ आदी विविध योजनांची माहिती देऊन अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. 
यावेळी अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अल्पसंख्याक समन्वयकांचा सत्कार जिल्हाधिकारी जिंतेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी शाहेद हुसेन व प्रकाश सोनी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव यांनी जिल्ह्यात अल्पसंख्यांक विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. यावेळीजिल्हा नियोजन कार्यालयातील सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गंगाधर चिंतळे, शेख मुमताजोद्दीन, गजानन गुंडेवाड,  शिक्षक मार्गदर्शक आणि अल्पसंख्यांक समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !