कापसाची माळ गळ्यात घालून आमदार अंतापूरकरांनी केले निदर्शन
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
आदमपुर: शेतकर्यांच्या प्रश्नावर आक्रमक होत आमदार जितेश अंतापूरकर यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा परीसरात राज्यशासनाला शेतकरी प्रश्नावर घेरण्याचे प्रयत्न केले.
हिवाळी अधिवेशन दरम्याण देगलुर बिलोलीचे काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार जितेश अंतापूरकर यांनी स्वतच्या गळ्यात कापसाची माळ घालून निदर्शन करत राज्यशासनाचे लक्ष वेधत शेतकऱ्यांचे समस्या वेधण्याचे प्रयत्न करत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केले.यावेळी मा.मुख्यमंञी आशोकराव चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीच्या आमदार व नेत्यासह आमदार अंतापूरकरांनी कापसाला भाव मिळालाच पाहिजे,शेतकर्यांची कर्जमाफी सरसकट माफी झालीच पाहिजे,शेतकरी संकटात असून त्यांना सरकारने तात्काळ आर्थिक मदत दिलेच पाहीजे व शेतमालाला योग्य भाव देण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणा यावेळी आमदार जितेश अंतापूरकरांनी देत सरकार विरोधात नागपूर हिवाळी अधिवेशनात तीर्व निदर्शन केले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा