मिनकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शालेय व्यवस्थापन समितीची निवडणूक
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
आदमपूर: बिलोली तालुक्यातील मिनकी येथील जिल्हा परिषद शाळेची नुतून शालेय व्यवस्थापन समिती गठीत करीत उपस्थित पालकातून समितीच्या अध्यक्षपदी बालाजी नाईक तर उपाध्यक्षपदी रमेश गायकवाड यांची बिनवरोध निवड करण्यात आली आहे.
मिनकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शालेय व्यवस्थापन समितीचा कार्यकाल संपले आल्याने नव्याने समिती गठीत करण्याच्या उद्देशाने येथील शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक अशोक पेंटे यांनी ता.७ रोजी शाळेत पालक सभा बोलवत उपस्थित पालकातून शालेय समितीचा कार्यकाल संपले असल्याने नवीन समिती गठीत करण्याचे प्रस्ताव मांडले. त्यानुसार अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात मिनकी गावचे सरपंच प्रतिनिधी तथा बिलोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आनंदराव बिरादार (गुरुजी) यांच्या पुढाकारातून उपस्थित पालकातून शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी बालाजी मधुकरराव नाईक तर उपाध्यक्षपदी रमेश शंकर गायकवाड यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
त्या सोबतच महीला सदस्या म्हणुन अर्चना पैलवार ,वंदना शिर्लेवार ,ललिता गायकवाड , रेश्मा शेख , वर्षा काळे , प्रकाश भंडारे ,बालाजी ईबितदार, हनुमंत गायकवाड , प्रल्हाद पाटील, उत्तम काळे ग्रामपंचायत मधुन स्विकृत सदस्य शिवाजी अंगावर शिक्षण प्रेमीतून स्विकृत सदस्य म्हणुन नागनाथ वासरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. समितीचे माजी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना निरोप देत नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचे बिलोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आनंदराव बिरादार व शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक अशोक पेंटे सह सर्व शिक्षक व पालकांच्या वतीने पुष्पहाराने सत्कार करीत अभिनंदन करण्यात आले आहे. यावेळी गावातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा