तामसा येथील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम प्रगतिपथावर
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
तालुक्यातील सर्वात मोठे सर्कल असलेल्या तामसा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा पुतळा उभारण्यात येत असून या पुतळ्याचे पायाभरणीचे काम सध्या प्रगतीपथावर चालू असून थोड्या दिवसांमध्ये तामसा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य तालुक्यातील सर्वात मोठा असा पुतळा उभारण्यात येणार आहे.
अनेक दिवसापासून तामसा येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारण्यात यावा यासाठी अनेकदिवसापासून तामसा सर्कल मधील नागरिकांची मागणी होती ही मागणी पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत तामसा व तामसा सर्कल मधील सर्व मराठा बांधवांनी लोकसहभागातून वर्गणी जमा करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे नांदेड नंतर दुसऱ्या क्रमांकावर हा पुतळा उभारण्यात येणार असून जमिनीपासून त्यांची उंची १५ ते २० फूट असणार आहे अनेक दानशुराने हा पुतळा उभारण्यासाठी मदत केली त्यामुळे या पुतळ्याचे काम प्रगतीपथावर सध्या चालू आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा