maharashtra day, workers day, shivshahi news,

बुध्द गया तीर्थ स्थळांना भेटी उपस्थितांनी केले सत्कार

बुध्द दर्शन सहली निमित्त खीर दान कार्यक्रम संपन्न

Visits to Buddha Gaya pilgrimage sites , Dharmabad , nanded , shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा,नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
धर्माबाद: दि १० डिसेंबर २०२३ रोजी रविवारी दुपारी दोन वाजेपर्यंत वाजता नरवाडे मंगल कार्यालय तरोडा नाका नांदेड येथे मानव कल्याण विचार मंच नांदेड अध्यक्ष जगनराव गोणारकर सचिव प्रा.अशोक कांबळे, साहेबराव कांबळे, विनायकराव वाघमारे,एम.टि.वामारे यांच्या च्या वतीने ८ नोव्हेबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान बुद्ध दर्शन धम्म सहल संपन्न झाली.भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत महू, नागपूर, सांची, सारनाथ, 
कुशीनगर, लुंबिनी , बुद्ध गया,राजगीर आणि नालंदा या सह अनेक पवित्र बौद्ध तीर्थ स्थळांना भेटी आगमना प्रित्यर्थ भव्य खीर दान (स्नेह भोजन )कार्यक्रम संपन्न झाला.याप्रंसगी फुले शाहू आंबेडकरांचे सुप्रसिद्ध व्याख्याते , स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ माध्यम शास्त्र संकुलाचे प्रमुख डॉ. राजेंद्र गोणारकर यांचे बौद्धमय भारत तीर्थस्थळ, आचरण या विषयावर व्याख्यान झाले.
यावेळी उपा.वैशालीताई जगन गोणारकर , उपा.अलकाताई अशोकराव कांबळे उपा. भारतबाई एम.टी. वाघमारे उपा.सुनिता साहेबराव कांबळे,उपा.जयश्री विनायकराव वाघमारे ,उपा. सविता संजय लोहबंदे ,उपा.किरणताई राजू टोम्पे, संगीता वामनराव कांबळे ,उपा.रमाबाई भिमराव कांबळे, उपा.शोभाताई संभाजी वन्नाळे,उपा. मधुमाला गौतम शिरशे ,उपा.जनाबाई आनंदराव वाघमारे, उपा.यमुनाबाई शंकर भोपाळकर,उपा. सुनिता नागभूषण वाघमारे, उपा.सुमनबाई नारायण कांबळे, उपा‌.अंजनाबाई रामराव कांबळे यांच्या सह बुद्ध गया गेलेल्या उपासकांनी कार्यक्रम आयोजित केले.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बुध्द गया गेलेल्या उपासना उपासिकांचा शाल, पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी वंचित बहुजन आघाडी मराठवाडा सदस्य डॉ संघरत्न कुर्र,नयोदय विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य शंकरराव कांबळे,प्रा.गंगाधर वाघमारे भोपाळकर, संस्थेचे अध्यक्ष तथा अनु.जाति काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष मनोहर पवार, नगर पालिका दक्षता समिती सदस्य तथा बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गंगाधर धडेकर,
राहुल गोणारकर, रंजीत गोणारकर,डॉ मिलिंद पाडूर्णीकर,विस्तार अधिकारी जीवन गोणारकर, माजी उपप्राचार्य पंडित वाघमारे, सेवानिवृत्त नायब तहसीलदार दिंगबर सिरसे,विजय सिरसे,शिवराज टोम्पे,बि.एन.वाघमारे धानोरकर, एकनाथ कार्लेकर,बालाजी गोणारकर, यशवंत कांबळे, प्रकाश कांबळे,भारतीय बौद्ध महासभा उमरी तालुका अध्यक्ष नामदेव कांबळे,बिलोली अध्यक्ष बि.के.वारघडे, नारायण सोनकांबळे,विज वितरण वरिष्ठ तंत्रज्ञ तथा संचालक सतिश वाघमारे, अशोक कांबळे, किशनराव सोनकांबळे , गोविंद माथुरे,के.के.वाघमारे वन्नाळीकर, रमेश वाघमारे, खानापुर सरपंच प्रतिनिधी गौतम वाघमारे,चंदनफुले, रमेश वाघमारे, संभाजी सोनकांबळे,एल.एस.वाघमारे, सुरेश लोंहबंदे ,
यांच्या सह जिल्ह्यातील बौद्ध उपासक उपासिकां मोठ्या संख्येने उपस्थित होते.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !