maharashtra day, workers day, shivshahi news,

पंढरपूर नगरपरिषदेची जुलमी करवाढ व इतर स्थानिक प्रश्नांबाबत आमदार आवताडे यांनी विधिमंडळ सभागृहाचे वेधले लक्ष

करवाढ रद्द करण्याची केली मागणी
MLA samadhan autade , Pandharpur , Mangalvedha , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध स्थानिक प्रश्न तसेच निरनिराळ्या विकासात्मक बाबींची पूर्तता करण्यासाठी भरीव निधी उपलब्ध व्हावा आणि पंढरपूर नगरपरिषदेने केलेली अतिरिक्त जुलमी प्रस्तावित करवाढ आदी प्रश्नांवर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे हे चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान पुरवणी मागणी वरील चर्चेत बोलताना आ. आवताडे यांनी पंढरपूर नगरपरिषदेने एका खाजगी संस्थेमार्फत सर्वेक्षण करून केलेल्या अतिरिक्त करवाढीमुळे  पंढरपूरकरांवरती पडणारा आर्थिक भार कमी व्हावा, बांधकामाचा खर्च वाढला आहे त्यामुळे घरकुलाचा निधी वाढवून मिळावा तसेच ७/१२ मध्ये संगणकीकरण करत असताना संबंधित तलाठी यांचेकडून झालेल्या चुका दुरूस्त करण्याकरिता विशेष प्रशिक्षण देण्याबाबत तसेच संजय गांधी निराधार लाभार्थी योजनेची उत्पन्नाची मर्यादा २१०००आहे त्यात वाढ करून ५०,००० करावी या या मुद्द्यांवर आमदार आवताडे यांनी सभागृहामध्ये कणखरपणे आपली बाजू मांडली आहे. त्याचबरोबर पंढरपूर नगरपरिषदे अंतर्गत २०१३ अध्यादेशानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर घरकुल योजनेअंतर्गत सफाई कामगारांसाठी मंजूर असलेल्या घरकुलासाठी २६९ स्क्वेअर फुट जागेवरून ५०० स्क्वेअर फुट जागा वाढवून  मिळण्याची मागणी आमदार आवताडे यांनी यावेळी केली.

भारताची दक्षिण काशी म्हणून लौकिक असणाऱ्या पंढरपूर येथील वारीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी ५ कोटी निधीची तरतूद केली होती, त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढ करून १०कोटी एवढ्या निधीची तरतूद केली आहे. सदर निधीमुळे वारी काळामध्ये पंढरपूर मध्ये येणाऱ्या वारकरी भक्तांसाठी विविध सोयी -सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आर्थिक सहकार्य झाले. येणाऱ्या काळामध्येही वारकरी भक्तांना अधिक चांगल्या सोयी देण्यासाठी या निधीमध्ये वाढ होऊन आणखी निधी मिळावा आणि मिळालेल्या निधीचा सदुपयोग झाला त्यावर आमदार आवताडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस ना.अजितदादा पवार यांचे तसेच सरकारचे मतदार संघातील जनतेच्या वतीने आभार ही व्यक्त केले.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !