जि प बांधकाम उपविभागचा सावळा गोंधळ
आरिफ शेख /सिंदखेड राजा तालुका प्रतिनिधीं शिवशाहीन्यूज..
सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी खुर्द ते हिवरखेड पुर्णा रस्त्याची फार दुरदशा झालेली आहे. सदर रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहे. या खड्यांमुळे वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पाऊस पडला तर सदर खड्यामध्ये पाणी साचून खड्यांचा अंदाज न लागल्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडत असून त्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्याचबरोबर राहेरी खुर्द येथील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी हिवरखेड पुर्णा व किनगांवराजा येथे ये जा करावी लागते. सर्व विद्यार्थ्यांना शासन स्तरावर कोणतीही वाहनाची व्यवस्था नसल्यामुळे सायकल किंवा खाजगी वाहनांने प्रवास करावा लागतो या शाळेतील विद्यार्थ्यांना या रस्त्यामुळे त्रास होतो. अपघाताच्या अशा अनेक कारणांमुळे सदरील रस्त्याकडे काळजीपुर्वक लक्ष द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
या आशयाचा दिनांक २५/८/२०२२ अर्ज देऊन सुध्दा सदर अर्जावर कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.
जि. प बांधकाम विभाग बुलढाणा व उपविभाग देऊळगाव राजा यांनी
सदर अर्जाचा विचार करून त्वरीत सदर रस्त्याची दुरूस्ती करावी. अशी मागणी निवेदन कर्त्यानी केली आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा