रक्तदाना सारखे मतदानही निस्वार्थपणे करा - सुरेशदादा गायकवाड
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
ग्रामीण भागामध्ये सुध्दा रक्तदान करण्यासाठी युवक पुढे येत आहेत. रक्तदान करणे हे चांगली गोष्ट आहे. कारण त्यांच्यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो. त्याच पद्धतीने डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला एका मताचा अधिकार न विकता युवकांनी रक्तदानासारखेच मतदानही निस्वार्थपणे करावे असे प्रतिपादन बी.आर.एस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड यांनी शंकर नगर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिरातील युवकांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सुरेश दादा गायकवाड यांच्या हस्ते करून रक्तदान शिबीरास सुरुवात करण्यात आले.
यावेळी अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी फुले शाहू आंबेडकर चळवळी चे भाष्यकार तथा बी. आर. एस .पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश दादा गायकवाड, साय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे ,माधवराव वाघमारे ,गौतम कांबळे , किशन गायकवाड सर, हळदे सर स्वराज्य युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष गोविंद हनवटे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता शंकरनगर तालुका बिलोली येथे फुले शाहू आंबेडकर क्रांती मंच च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील कांबळे, क्रांती कांबळे,धम्मानंद सोनकांबळे रातोळीकर, इंद्रजीत डुमणे , गौसभाई शेख,दिपक कांबळे, जयदीप कांबळे, अल्केश केसराळीकर, सुमित कांबळे, श्रीकांत कांबळे,शिवाजी सोनकांबळे,निळकंठ तरटे, राहुल गायकवाड ,प्रकाश होनसांगडे, सूर्यकांत भेदे, किरण इंगळे, संदीप उंबरे,राजु बनसोडे, मधुकर पाटील केरुरकर, धम्मानंद सोनकांबळे, राहुल भेदेकर, बाबू भेदेकर, स्वप्निल तुरेराव, शेषराव गावंडे, अजय गावंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक फुले शाहू आंबेडकर क्रांती मंच चे प्रमुख भास्कर भेदेकर यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंद्रजीत डुमणे यांनी केले तर आभार नागसेन जिगळेकर यांनी मानले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा