डॉ.सौ. मीनलताई पाटील खतगावकर यांनी केली पाहणी
शुक्रवार दि.08 रोजी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची नायगाव शहरातील बैल बाजार मैदानात ५५ एकर जागेवर भव्य विराट सभा होणार आहे.या सभेची सध्या जोरदार तयारी सुरू असून,नायगाव शहरातील व तालुक्यातील गावा गावात सर्व भागात बॅनर बाजी ,मुख्य रस्त्यावर भगव्या कमानी ,शिवाय रस्त्याचा मध्यभागी कटाऊटस् यामुळे नायगाव शहर सर्वत्र जरांगेमय झाले आहे.
सीमावर्ती तेलंगणा व कर्नाटक भागासह,उमरी,धर्माबाद,बिलोली,देगलूर, मुखेड आणि नायगाव या सहा तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव या सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.यासाठी 55 एकर मोकळ्या जागेवरील मैदानात बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. दहा एलईडी स्क्रीन द्वारे या सभेचं थेट प्रक्षेपण होणार असून, 3000 लाऊड स्पीकरची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

या सभेदरम्यान 70 हजार मराठा समाज बांधवांना मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने तर एक लाख बांधवांना ओबीसी समाज बांधवांकडून भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे.ड्रोनद्वारे या सभा स्थळाचं चित्र टिपलं आहे डिजिटल मीडियाचे ता अध्यक्ष तथा छायाचित्रकार भगवान शेवाळे पत्रकार निळकंठ जाधव यांनी आपल्या कॅमेरात कैद केले आहे.
नायगाव तालुक्या सह सहा ही तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव गावोगावी जाऊन या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी बैठका घेत असुन नायगाव व सहा ही तालुक्यात जरांगे पाटील यांच्या सभेची च चर्चा ऐकावयास मिळत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा