कॉग्रेसविरोधी घोषणांनी आसमंत दणाणले
शिवशाही वृत्तसेवा, धर्माबाद (प्रतिनिधी नारायण सोनटक्के)
काँग्रेसचे झारखंड राज्यातील खासदार धीरज साहू यांच्याकडे आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत 300 कोटी पेक्षा जास्त अवैध पैसा मिळालेला आहे. त्यामुळे धर्माबादेत तालुका भाजपतर्फे खासदार धीरज साहू यांचा आणि काँग्रेस पक्षाचा
जाहीर निषेध करण्यात आला.
नायगांव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार राजेश पवार आणि महीला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.पुनमताई राजेश पवार यांच्या मार्गदर्शनानुसार हा निषेध करण्यात आला. यावेळी महिला मोर्चा नांदेड जिल्हा अध्यक्ष पूनम पवार, भारतीय जनता पार्टी महिला जिला उपाध्यक्ष प्रतीक्षा पाटील, नायगाव शहर अध्यक्ष जयश्री पाटील, मनीषा कल्याण, भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष दत्ता पाटील ढगे, आकाश पाटील धुपेकर, गजानन चव्हाण, माधवराव कोलगाने, धर्माबाद भाजप तालुका अध्यक्ष विजय पाटील डांगे, विधानसभा निवडणुक प्रमूख विठ्ठल पाटील चोळाखेकर, महीला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा पद्मावती रामोड, महिला मोर्चा जिल्हा चिटणीस वैशालीताई भोसले, सुनीता जंगीलवाड, गंगमनी मुंडलोड, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष संतोष मोरे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विठ्ठल आश्टे, OBC मोर्चा अध्यक्ष नागनाथ जिंकले,
युवा मोर्चा शहराध्यक्ष सतिश मोटकुल, तालुका सरचिटणीस चक्रेश पाटील, आकाश आडपोड, तालुका उपाध्यक्ष अवधूत जाधव, शहर उपाध्यक्ष चैतन्य घाटे, तालुका कोषाध्यक्ष गुलाब पाटील मोरे, नागनाथ भंडारे, तालुका सरचिटणीस सुधाकर कदम, किसान मोर्चा कोषाध्यक्ष विनायकराव मंडगे, obc शहर अध्यक्ष बालाजी चिंतावार, सोशल मिडिया पंढरी भोजमोड, संतोष पाटील जाधव, ईश्वर आवरे, शाम जाधव, आनंद मोकंमपल्ले, लक्ष्मण भोसले,साई शिंदे व इतर अनेक पदाधिकारी व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आंदोलकांनी कांग्रेस हटाव - गरीब बचाव, काँग्रेस गोलमाल - जनतेचे हालहाल, मळलेला हात - करतो जनतेचा घात, काँग्रेसचा हात - पोटावर लाथ, कैश की कोठरी - पाप की गठरी, मोहब्बत की दुकान - चोरी का सामान, आशा प्रकारच्या घोषणा आंदोलकांनी दिल्या.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा