संगणक परिचालकावर उपासमारीची वेळ
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
महाराष्ट्र राज्यातील 27,893 ग्रामपंचायत मध्ये आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्प केंद्र शासन व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे व त्यामध्ये 19475 संगणक परिचालक कार्यरत असून शासनाच्या ग्रामविकास विभाग व इतर विभागाच्या सर्व सेवा सुविधा अहोरात्र पुरविण्याचे काम मागील बारा वर्षापासून संगणक परिचालक करीत आहेत.परंतु शासन त्यांच्या मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे परिणामी संगणक परिचालकावर उपासमारीची वेळ आलेली आहे त्यांचे कुटुंब वाऱ्यावर पडले आहेत.
परिणामी या मानसिक त्रासाला कंटाळून महाराष्ट्रातील संगणक परिचालक आत्महत्या करण्याच्या मानसिकतेमध्ये पोहोचले आहेत त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील हिप्परगा थडी येथील संगणक परिचालक श्री अंबादास नागोराव पेटेकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयातच गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे आजच्या महागाच्या काळात त्यांना 6,930 रुपये एवढे तूटपुंजे मानधन मिळाले.
सीएससी एसपीव्ही नावाच्या कंपनीमार्फत त्यांची नियुक्ती करण्यात आलेली ती कंपनी रिंगटोन प्रशिक्षण व्यवस्थापन खर्चाच्या नावावर प्रति महिना 13511 रुपये घेते आणि त्यातील फक्त 6900 रु. संगणक परिचालक बांधवांना मिळतात व बाकीचे कंपनीला मिळतात यातील रिंग टोनर हे वर्षातून फक्त एक किंवा दोन वेळेस मिळते आणि प्रशिक्षण तर मिळतच नाही असा कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार कंपनी करीत आहे तरीसुद्धा ग्राम विकास विभाग असो किंवा शासन कंपनीच्या विरोधात कुठलेच पाऊल उचलत नाही त्यामुळे दिवसेंदिवस कंपनीचा अत्याचार मानसिक त्रास व तीन तिनं महिने मानधन न देणे असा पराक्रम चालू आहे
त्यामुळे शासनाच्या व कंपनीच्या तुघलकी कारभाराला कंटाळून संघटनेने 8 नोव्हेंबर पासून बेमुदत कामबंदचे हत्यार उपसले आहे परंतु शासनाला त्यांची कसली समस्या निराकरण करून न्याय देण्याचे धोरण नाही.
दिनांक 11 डिसेंबरला शासनाने कंपनी व संघटनेची बैठक रात्री 11 ला घेतली आणि पुन्हा एकदा आश्वासन देऊन संगणक परिचालकाचा भ्रमनिराश केला त्यामुळे या सर्व गोष्टीचा अधिकार करून राज्यातील सर्व 27,863 ग्रामपंचायतीच्या संगणक परिचालक बांधवांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत विधानभवनावर मोर्चा करण्याचे नियोजन केले आहे व आज दिनांक 13 डिसेंबर पासून चाचा नेहरू उद्यान ते विधान भवन असा विराट मोर्चा होणार आहे.
संगणक परिचालकांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
1) मा.यावलकर समितीचा अहवाल स्वीकारून महाराष्ट्र राज्यातील सर्व संगणक परिचालकांचा विनाअट सुधारित आकृतीबंधात समावेश करण्यात यावा
2) मा. यावलकर समितीच्या शिफारशीनुसार आकृतीबंधात समावेश करण्यास वेळ लागत असेल तर तोपर्यंत मासिक रुपये 20000 रुपये मानधन एका निश्चित तारखेला देण्यात याव
4) महाराष्ट्रातील सर्व पंचायत समिती व जिल्हा परिषद जुन्या संगणक परिचालकांनाच घेण्यात यावे व त्यांच्या मंदिरात मासिक रुपये 5000 रुपये वाढ करण्यात यावी
मागण्या पूर्ण होईपर्यंत नागपूर सोडणार नाही असा विश्वास सांगण्यात परिचालक बांधवांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला.
आज दिनांक 13 डिसेंबर रोजी आम्ही संघटनेमार्फत विराट आक्रोश मोर्चाचे आयोमागण्या पूर्ण होईपर्यंत नागपूर सोडणार नाही असा विश्वास सांगण्यात परिचालक बांधवांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला आहेजन केले आहे व शासन आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही नागपूर सोडणारच नाही परिणामी आमचा जीव गेला तरी मागे हटणार नाही शासनाला 2015 चा नागपूर मोर्चाची पुनरावृत्ती करून दाखवायचे आहे शासनाने आमचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा असा मी राज्याध्यक्ष या नात्याने शासनाला विनंती करतो.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा