maharashtra day, workers day, shivshahi news,

आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेडच्या वतीने तालुकास्तरीय भव्य पदाधिकारी सन्मान सोहळा व शाखा उद्घाटन

मोठ्या प्रमाणात भाविक भक्त राहणार उपस्थित
Honor Ceremony and Branch Inauguration , Warkari Parivar Charitable Institution , naigaon , nanded , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड च्या नायगाव तालुक्यातील कार्यकारणी व सदभक्तांना नवनियुक्त नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. हुस्सा येथील शाखेचे उद्घाटन व नामफलकाचे अनावरण सोहळा कार्यक्रम दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी होणार असून त्या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील व तालुक्यातील मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येणार असल्याची माहिती संयोजक मंडळी यांच्याकडून कळविण्यात आली आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील प्रसिद्धी प्रमुख आघाडी,महिला आघाडी,युवक आघाडी,आणि तालुका प्रसिद्धीप्रमुख आघाडी,तालुका महिला आघाडी,तालुका युवक आघाडी,अशा विविध पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात येत आहे.

 सदर कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक तथा आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य ह.भ. प. श्री राम महाराज पांगरेकर यांच्या शुभहस्ते नायगाव तालुक्यातील मौजे हुस्सा येथील शाखा उद्घाटन सोहळा व नामफलकाचे  अनावरण सोहळा संपन्न होणार आहे तरी या पवित्र सोहळ्यास हुस्सा येथील शाखेचे उद्घाटन ह.भ.प.श्री राम महाराज पांगरेकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. तरी या कार्यक्रमादरम्यान नायगाव तालुक्यातील विविध गावातील सदस्यांना तालुका व ग्रामस्तरावर नवनियुक्त कार्यकारणी जाहीर करण्यात येणार आहे आणि त्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मान देखील करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती संयोजक मंडळीकडून देण्यात आली आहे.

              सदर कार्यक्रमाला जिल्ह्यातून व जिल्ह्यातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात दिग्गज मंडळी व गुरुवर्य राम महाराज पांगरेकर यांची उपस्थिती लाभणार असून या भव्य आणि पवित्र अशा कार्यक्रमाला नायगाव तालुक्यातील मोठ्या प्रमाणात भावीक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन देखील संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य राम महाराज पांगरेकर यांनी केले आहे. जीवनात अमुलाग्रह व संतांच्या सानिध्यात वावरण्यासाठी संत संग मार्ग हाच खरा मार्ग आहे आणि जीवनामध्ये धार्मिक कार्य करण्यासाठी ज्ञानभक्ती आणि जीवन सुखकर करण्यासाठी भक्तिमार्ग फार महत्त्वाची आहे.

 म्हणून अशा महान प्रसंगी आपली उपस्थिती असणेही गरज असल्याचे देखील ह भ प श्री राम महाराज पांगरेकर यांनी सांगितले आहे. आणि सदर कार्यक्रमांमध्ये श्री राम महाराज पांगरेकर यांच्या रसाळ ज्ञान अमृतांचे गोडवे घेण्याकरिता नांदेड जिल्ह्यातील व नायगाव तालुक्यातील भाविक भक्तांना या पवित्र कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे नायगाव तालुका अध्यक्ष सोपान पाटील गिरे व हुस्सा येथील शाखा अध्यक्ष श्री महादेवराव तुकाराम वाघमारे प्रकाश वाघमारे शंकर वाघमारे किशोर वाघमारे सूर्यकांत वाघमारे यांनी केले आहे.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !